Day Trek to Prabalgad

Sep 27 2020 to Sep 27 2020

story.user.firstName
Sanika Joshi
Sep 27 2020

पावसाळ्याच्या दिवसांत मुंबई आणि आसपासचा परिसर खुपच बहरून जातो. अश्या मोसमात hike करण्याची मजा काही औरच. मुंबई ला परत येऊन आम्हाला दोन वर्ष झाली. पण मागच्या दोन्ही पावसाळ्यात आम्ही कोणत्याच hike ला नाही गेलो. म्हणुन या वर्षी ठरवला एकदा तरी गेलेच पाहिजे. मागच्या महिन्यात लोहगडावर गेलो होतो. आज आम्ही प्रबळगडावर गेलो. कलावंतीण हा मुंबई जवळचा popular ट्रेक आहे. पण हा थोडा अवघड आहे आणि इथे पावसाळय़ात जाणे recommended नाही. म्हणुन आम्ही त्याच्या बाजूचा प्रबळगड निवडला. सकाळी साडेसात ला आम्ही मुलुंड वरून निघालो. आम्हाला पायथ्याशी पोचायला एक सव्वा तास लागला. पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या गावातून ट्रेक चालू होतो. पहिले अर्धे अंतर प्रबळगड आणि कलावंतीण मध्ये common आहे. प्रबळमाची वरून दोघांचे रस्ते वेगळे होतात. एक तास आम्हाला प्रबळमाची ला पोचायला लागला आणि पुढे गडावर पोचायला अजून दोन तास लागले. जितके ऐकले होते तितका काही ट्रेक सोप्पा नव्हता. पण easy असेल तर मजा कशी येणार. दगडांमधुन वाट काढण्यात, गप्पा मारण्यात, बाकी आलेल्या लोकांशी बोलण्यात वेळ कसा गेला हे कळलच नाही. परत येताना आम्ही प्रबळमाचीवर मस्त चिकनच्या थाळी वर ताव मारला. गरम गरम रस्सा, तांदळाची भाकरी आणि गरम भात.. आ हा हा.. एकदम श्रमपरिहार झाला. नंतर पुढचे अंतर एक अर्ध्या तासात cover झाले. आणि drive करून आम्ही सहा पर्यंत घरी पोचलो.

प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट
प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट

प्रबळमाचीच्या पायथ्याशी असलेले हे गाव. इथे गाडी पार्क करून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली

प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट
प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट

भाताची पेरणी चालू होती किंवा झालेली होती. सलग रेषेत पेरलेले भाताचे शेत खूप मस्त वाटत. गाडीतून काढल्यामुळे हा फोटो तितका चांगला आलेला नाही.

प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट
प्रबळगड ट्रेक स्टार्टिंग पॉइंट

इथे दर माणशी पन्नास रुपये fee आहे. इथे washroom chi सोय नाही. डायरेक्ट प्रबळमाची वर washrooms आहेत.

Prabalmachi
Prabalmachi

जाताना दिसलेले एक सुंदर फुल. Hike मध्ये अशा वेग वेगळ्या पानाफुलांनी मजा येते.

Prabalmachi
Prabalmachi

माचीवर जाताना थोड्या थोड्या अंतरावर चहा, पाणी, लिंबू सरबत विकणार्‍या टपर्या आहेत. इथे तर झाडांवर मस्त झोके लावले होते. आम्ही सगळ्यांनी थोडा वेळ झोका मस्त enjoy केला.

Prabalmachi
Prabalmachi

Prabalmachi
Prabalmachi

Kalavantin Trek Start Point
Kalavantin Trek Start Point

डावीकडचा कलावंतीण आहे आणि उजवीकडचा प्रबळगड!!

Camping at prabalmachi
Camping at prabalmachi

प्रबळमाची गावातील घरे. इथे गाड्या नाही येत. चालतच यावे लागते.

Prabalmachi Camping
Prabalmachi Camping

इथे राहण्याची आणि खायची उत्तम सोय आहे. लोक आदल्या दिवशी येऊन Camping पण करतात. आम्ही पोचलो तेव्हा इथे मस्त वारा सुटला होता. फोटो काढण्यात, view बघण्यात आम्ही काही वेळ इथे time pass केला.

Prabalgad
Prabalgad

चलनेका, खानेका और बाते करनेका... मज्जान्नी लाइफ!!

Prabalgad
Prabalgad

प्रबळगडावर जायचा रस्ता थोडा confusing आहे. गावातून जाऊन मग तुम्ही पायथ्याशी पोचता. तिथून साधारण अर्ध्या अंतराने एक चहा टपरी येते. तिथे हा फोटो काढला.

Prabalgad
Prabalgad

गडावर जाताना दिसलेल्या पानांचा फोटो.

Prabalgad
Prabalgad

Prabalgad
Prabalgad

इथे आम्ही finally गडावर पोचलो होतो. तिथून दोन वाटा जातात एका वाटेने गेले तर कलावंतीण दुर्ग दिसतो आणि दुसर्‍या वाटेने तलाव आहे. आम्ही कलावंतीण पाहायला गेलो.

Prabalgad
Prabalgad

प्रबळगडावरून कलावंतीण दुर्ग सुंदर दिसतो. त्यावर चढणारे पण दिसतात. त्याला चढायला पायर्‍या आहेत पण steep चढावामुळे तो कठीण होत असावा. कधीतरी या गडावरही चढून बघू.

Prabalgad
Prabalgad

पायथ्याशी काढलेला हा फोटो.

Prabalmachi Camping
Prabalmachi Camping

प्रबळमाची वरील चविष्ट जेवण. पहिले फोटो काढायची आठवण न राहिल्यामुळे दुसर्‍या भाकरीच्या वेळेस हा फोटो काढला :)

Prabalmachi
Prabalmachi

Liked by Nupur Mehta, HIMANSHU DUBEY, and 10 others

Comments

Satyajeet's photo
Satyajeet Jadhav

Sep 27 2020

Nice pics Sanika